भारतीय स्वातंत्र्याच्या 76 वा प्रजासत्ताक दिन महोत्सवानिमित्त (Republic Day) देशभरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन (26 january) साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री त्रिपुरा क.विज्ञान महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण व प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
लातूर पॅटर्नचा चेहरा असणारे श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर महाविद्यालयातील एनडीए बॅचच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थिथांचे मने जिंकली. व चालू शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच क्रीडाक्षेत्रातील जिल्हास्तरीय, विभागीय व राज्य पातळीवरील स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून गौरव करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती पर गीत सादर करून प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत केली. या वेळी संस्थेच्या सचिव तथा प्राचार्य सुलक्षणा केवळराम व कार्यकारी संचालक ओंकार होनराव व प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.